Video Post
Labels
Total Pageviews
मुख्य संपादक
पोलीस भरतीसाठी धावणाऱ्या युवकाने दिले घोरपडीला जीवदान वन्यजीव संरक्षण अधिकाऱ्याने दिली कौतुकाची थाप
Responsive Ad Here
पोलीस भरतीसाठी धावणाऱ्या युवकाने दिले घोरपडीला जीवदान वन्यजीव संरक्षण अधिकाऱ्याने दिली कौतुकाची थाप
पैठण प्रतिनिधी सुनील आडसुळ
पैठण :-जायकवाडी धरणाच्या भिंतीवरून पोलीस भरती साठी धावण्याचा सराव करणाऱ्या एका युवकने अज्ञात शिकारी घोरपडपीची शिकार करत असतांना बघीतले आणि हटकले असता त्यांनी त्यांच्याकडील कुत्र्या सह पळ काढला तेव्हा मुर्छीत झालेल्या घोरपडीस आपल्या ताब्यात घेऊन वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल सपकाळ यांच्याशी संपर्क करून घोरपडीस तिच्या विहार क्षेत्रात मुक्त केले या जीवदानामुळे वन्यजीव संरक्षण विभागाच्या वतीने युवकाचा गौरव करण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी की जायकवाडी उत्तर येथील युवक हर्षवर्धन आव्हाड वय वर्ष २३ हा जायकवाडी धरणाच्या भिंतीवर बुधवारी सकाळी धावण्याच्या सराव करीत असतांना एक शिकारी कुत्रा आणि दोन अज्ञात एका घोरपडीचा पाठलाग करताना दिसले तेव्हा हर्षवर्धन आव्हाड याने धावणे थांबवू घडत असलेला प्रकार बघीतला आणि काही विचारण्याचे आगोदरच ते अनोळखी युवक आणि कुत्रा पळून गेले. तेव्हा मुर्छीत झालेल्या घोरपडीस आपल्या ताब्यात घेतले आणि वन्यजीव संरक्षण अधिकारी वनक्षेत्र अधिकारी राहुल सपकाळ यांच्याशी संपर्क केला आणि घोरपडीस सुरक्षित तथा तीच्या मुळ विहार वास ठिकाणी सोडण्यात आले यावेळी सर्व श्री वनक्षेत्र अधिकारी राहुल सपकाळ, वन्यजीव पैठण, पी एस दांडगे वनपाल पैठण, अनिता जाधव / चव्हाण वनरक्षक पैठण, जस पदार वन मजूर पैठण आदी ची प्रमुख उपस्थिती होती.
Video Post
SidDhi Printers
न्युज पोर्टल, न्युज चॅनेल, वेब साठी संपर्क करा
8177881420