Video Post
Labels
Total Pageviews
मुख्य संपादक
आषाढी एकादशी वारीनिमित्त नाथनगरी दुमदुमली
Responsive Ad Here
पैठण प्रतिनिधी सुनील आडसुळ*
पैठण येथे आषाढी एकादशीनिमित्त रात्री उशिरापर्यंत हजारो वारकरी भाविक भक्त पवित्र गोदास्नान व नाथ बाबांचे दर्शन घेण्यासाठी मुक्कामी दाखल झाले आहेत. दोन्ही नाथ मंदिरात भजन, हरिनाम व भानुदास व एकनाथांचा गजर सुरू झाला आहे.
ज्या वारकरी भाविक भक्तांना पंढरीला जाता आले नाही असे लाखो वैष्णव पैठणला वारीसाठी येतात. यात गावोगावच्या लहान मोठ्या पायी वारकरी दिंड्यांचाही समावेश असतो. शेकडो वर्षांची परंपरा आजही तेवढीच भक्तिभावाने साजरी केली जाते नाथ नगरीत यंदा सुरूवातीपासूनच किमान पेरणी व लागवड योग्य पाऊस झाल्याने शेतकरी वर्गाची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढण्याची शक्यता पहायला मिळत आहे. आलेल्या भाविक भक्तांना सुरळीतदर्शन घेता यावे यासाठी खासदार तथा अध्यक्ष संदिपान पा.भूमरे यांच्या मार्गदर्शनाखाली नाथ संस्थानने अवश्यक त्या उपाययोजना केल्या आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी शिद्धेश्वर भोरे व पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी संपूर्ण शहर व परिसर तसेच यात्रा मैदान,बस स्थानक आदी ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे
*रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी पैठण /छ.संभाजीनगर प्रतिनिधी सुनील आडसुळ*
Video Post
SidDhi Printers
न्युज पोर्टल, न्युज चॅनेल, वेब साठी संपर्क करा
8177881420