Video Post
Labels
Total Pageviews
मुख्य संपादक
बस नेहमी उशिरा येत असल्याने विद्यार्थिनींची हेडसांड,२ तास वाट पाहून विद्यार्थिनीना कळले बस येणार नाही म्हणून
Responsive Ad Here
केळापूर प्रतिनिधी हनुमान लसंते
यवतमाळच्या केळापूर तालुक्यातील पाटणबोरी येथील सायंकाळी 5 वाजता येणारी बस आलीच नाही. त्यामुळे स्थानिक जनता शाळेच्या विद्यार्थिनींना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला. सात किलोमीटर वरील गव्हारा येथील या विद्यार्थिनी पाटणबोरी येथील जनता शाळेमध्ये शिक्षण घेत आहे. पाटणबोरी येथील बस स्थानकावर कोणत्याही प्रकारच्या सोयी सुविधा नसल्याने या विद्यार्थ्यांना तब्बल दोन तास तसेच ताटकळत उभे राहावे लागले. मात्र बस आलीच नाही .बस स्थानकावरील एका दुकानदाराने बस स्थानक पांढरकवडा येथे फोन लावून चौकशी केली असता,बसचा टायर फुटला असल्याने आज बस येणार नसल्याचे त्यांनी सांगितले .त्यामुळे बस येणार नसल्याचे तब्बल दोन तासानंतर माहिती झाले. यानंतर विद्यार्थिनींकरिता 2 ऑटो मागविण्यात आल्या. दोन ऑटो मध्ये जवळपास 25 विद्यार्थिनी बसून आपल्या स्वगावी परत गेल्या. गवारा येथे जात असताना सद्यस्थितीत वाघाची मोठी दहशत आहे. सायंकाळी या परिसरात कोणीही घराबाहेर पडत नाही. अशा परिस्थितीत विद्यार्थिनींना जीव मुठीत घेऊन घरी परतावे लागले. विद्यार्थिनींचा अमूल्य वेळ देखील वाया जात आहे.
Video Post
SidDhi Printers
न्युज पोर्टल, न्युज चॅनेल, वेब साठी संपर्क करा
8177881420