Breaking News

Call - 7798589680. . . .8600682015. . . . . रिपब्लिकन वार्ता मुख्य संपादक डॉ.अनिल आठवले . . . कार्यकारी संपादक - सलीम सय्यद बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा - 7798589680. . . . 8600682015. . . . . Call - 7798589680. . . .8600682015. . . . . रिपब्लिकन वार्ता मुख्य संपादक डॉ.अनिल आठवले . . . कार्यकारी संपादक - सलीम सय्यद बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा - 7798589680. . . . 8600682015. . . . .

समृद्धी महामार्गावर गुटख्याने भरलेला आयशर पकडला,महामार्ग व फुलंब्री पोलीसांची संयुक्त कारवाई

Responsive Ad Here
फुलंब्री/औरंगाबाद प्रतीनिधी अकबर शहा
छत्रपती संभाजी नगरच्या फुलंब्री पोलीस ठाणे हद्दीतील समृद्धी महामार्गावर पोलीसांनी गुटख्याने भरलेला आयशर पकडला. याबाबत सविस्तर वृत्त असे की, फुलंब्री पोलीस ठाणे हद्दीतील समृद्धी महामार्गावर कृष्णापुर वाडी गावच्या बोगद्याजवळ पोखरी टनेलजवळ दिनांक 16 जुलै रोजी पेट्रोलिंग करत असताना एक आयशर ट्रक सुसाट वेगाने अनेक वाहनांना धक्के देत समृद्धी महामार्गावरून जात आहे व काही लोक त्या आयशर ट्रकचा पाठलाग करत आहे अशी माहिती मिळाली असता सांगितलेल्या क्रमांकाचे आयशर क्रमांक एमएच- 20 जि सि /2385 सुसाट वेगाने नागपूर कडून येताना दिसला असता हायवे पोलीसांनी आयशर ट्रक थांबला व त्याच्या चालकाला विचारपूस केली असता चालक अरेरावी करत असल्याने फुलंब्री पोलीसांना त्याठिकाणी बोलावण्यात आले.व सदर आयशर ट्रकची पाहणी केली असता त्यात गुटखा असल्याचे दिसून आले. त्यानंतर हा आयशर ट्रक फुलंब्री पोलीस ठाण्यात आणून लावला व संपुर्ण ट्रक तपासून पाहिले असता त्यात मस्तानी प्रिमियम चेनिंग व बाजीराव पानमसाला एकुण 75 गुटख्याचे पांढऱ्या रंगाचे गोण्या किंमत 63 लाख 96 हजार 330 रूपयांचे गुटखा भरलेल्या अढळून आले तसेच 20 लाख रुपये किंमतीचा जुना आयशर ट्रक असा एकूण 83 लाख 96 हजार 330 रूपयांचे मुद्देमाल जप्त करण्यात आले. सदरची कारवाई हायवे पोलीस व फुलंब्री पोलिसांनी एकत्रित करून अंबादास अर्जुन मढीकर वय 33 वर्ष राहणार वाळूज तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर याच्या ताब्यातून हा प्रतिबंधित सुगंधी पान मसाला व आयशर वाहन जप्त करून कायदेशीर कारवाई करण्यात आली. *रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी फुलंब्री औरंगाबाद प्रतीनिधी अकबर शहा*