Breaking News

Call - 7798589680. . . .8600682015. . . . . रिपब्लिकन वार्ता मुख्य संपादक डॉ.अनिल आठवले . . . कार्यकारी संपादक - सलीम सय्यद बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा - 7798589680. . . . 8600682015. . . . . Call - 7798589680. . . .8600682015. . . . . रिपब्लिकन वार्ता मुख्य संपादक डॉ.अनिल आठवले . . . कार्यकारी संपादक - सलीम सय्यद बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा - 7798589680. . . . 8600682015. . . . .

दुबार पेरणीच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी मनसे सरसावली

Responsive Ad Here
*नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना बियाण्यांची पुन्हा मदत-अनिल हमदापुरे यांचा पुढाकार..!*
केळापूर प्रतिनिधी हनुमान लसंते
यवतमाळ जिल्ह्यामध्ये गेल्या काही काळात पावसाने दडी मारली होती त्यामुळे गर्मीच्या वातावरणामुळे अनेक अल्पभूधारक गरीब शेतकऱ्यांनी पेरलेले बियाणे वाया गेले. अशा परिस्थितीत आसमानी संकटात सामना करत असलेल्या यवतमाळ विधानसभेतील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मनसे सरसावली असुन मनसेचे यवतमाळ जिल्ह्याचे नेते अनिल हमदापुरे यांच्या हस्ते संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना कपासी आणि तुरीचे बियाण्याचे वाटप करण्यात आले. कोणत्याही प्रकारची शासकीय मदत नसताना काही शेतकऱ्यांनी उसनवारी करून आपल्या शेतात पेरणी केली होती. अनेक शेतकऱ्यांनी कर्जबाजारी होऊन सुद्धा आपल्या शेतात पेरणी केली होती. परंतु निसर्गाने आपला डाव साधत काही शेतकऱ्यांना या प्रकोपाचा फटका बसला. मनसेच्या वतीने या दुबार पेरणीच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ शासकीय मदत शासनाने जाहीर करावी अशी मागणी सुद्धा अनिल हमदापुरे यांनी याप्रसंगी केली. यावेळी प्रामुख्याने परिसरातील शेतकरी, तसेच मनसेचे लकी छांगाणी, गोपाल घोडमारे, सौरभ अनसिंगकर, गजानन चौधरी, सदाशिव घोटकर, निळकंठ बोरकर, कृष्णा तिरमारे, गोपाल राठोड, रुपेश कालोकार यासह इतर गावातील नागरिक उपस्थित होते...! *रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी केळापूर प्रतिनिधी हनुमान लसंते यवतमाळ*