Breaking News

Call - 7798589680. . . .8600682015. . . . . रिपब्लिकन वार्ता मुख्य संपादक डॉ.अनिल आठवले . . . कार्यकारी संपादक - सलीम सय्यद बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा - 7798589680. . . . 8600682015. . . . . Call - 7798589680. . . .8600682015. . . . . रिपब्लिकन वार्ता मुख्य संपादक डॉ.अनिल आठवले . . . कार्यकारी संपादक - सलीम सय्यद बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा - 7798589680. . . . 8600682015. . . . .

पाचोड जवळ भरधाव कारने स्कुटीला चिरडले दांपत्य जागीच ठार

Responsive Ad Here
पैठण प्रतिनिधी सुनील आडसुळ
पैठण भरधाव वेगातील कार चालकाचे स्टेअरिँगवरील नियंत्रण सुटल्याने कार दुभाजकाला धडकून दुसऱ्या दिशेने जाणाऱ्या स्कुटीला धडकून लांबपर्यंत फरफटत नेऊन नाल्यामध्ये कार पलटी झाली. या भीषण अपघातामध्ये दुचाकीस्कुटी वरील पती-पत्नी जागीच ठार झाल्याची धक्कादायक घटना रविवारी दि.७ सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पाचोड जवळील लेंभेवाडी शिवारातील घडली. अँड.सतिश शाहू मगरे वय ३२, तेजल सतिश मगरे वय३० दोघेही रा.पाथरवाला हल्ली मु.पो.अंकुशनगर ता.अंबड असे अपघातात ठार झालेल्या पती-पत्नीचे नाव आहे.दरम्यान अपघात घडताच कार चालक कार सोडून घटनास्थळावरुन पळ काढला. याविषयी अधिक माहिती अशी की, सतीश मगरे व्यवसायाने वकील असल्याने ते त्यांच्या पत्नीसह मागील चार महिन्यापासून छ.संभाजीनगर येथे वास्तव्यास होते. मात्र दोन दिवसांपूर्वी त्यांच्या पुतणीचा अंकुशनगर या ठिकाणी साखरपुडा असल्याने दांपत्य साखरपुडाच्या कार्यक्रमाला आले होते. साखरपुड्याचा कार्यक्रम आटोपून रविवारी सायंकाळी सहाच्या दरम्यान छत्रपती संभाजीनगर येथे दुचाकी स्कुटी क्रमांक एम.एच.२१/बी.एन‌- ९९२३ वरून जात असताना धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पाचोडपासून काही अंतरावरील लेंभेवाडी शिवारात येताच त्यावेळी छत्रपती संभाजीनगरहून भरधाव वेगात येणाऱ्या कार चालकाचे कारवरून नियंत्रण सुटल्याने कार क्रमांक एम एच .४४.एस. ९५६०ही महामार्गाच्या मधोमध असणाऱ्या दुभाजकाला धडकून उंच उडवून समोरून जाणाऱ्या स्कुटी वरती आदळली, यावेळी स्कुटी ही कारच्याखाली दबली असल्याने त्या कारने स्कुटीला शंभर फूट फरफडत नेले व स्कुटी वरील पती-पत्नीला ही फडफडत नेऊन राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला मोठ्या नाल्या करण्यात आलेले आहे. त्या नाल्यांमध्ये कार स्कुटीच्या वरती जाऊन उलटली होती. यावेळी स्कुटी वरील अँड सतीश मगरे, तेजल मगरे हे दोघेही जण त्या चारचाकी वाहनाखाली तब्बल अर्धा तास दबून राहीले आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, त्या स्कुटीचा संपूर्ण चक्काचूर झाला तसेच कारची देखील मोठे नुकसान झाले.हा भीषण अपघात घडल्यावर कारचालकाने अपघातात जखमी झालेल्या पती-पत्नीस मदत करण्याऐवजी त्या ठिकाणाहून पळ काढला आहे.अपघात झाल्याची माहिती स्थानिकांना मिळतात त्यांनी तात्काळ भोकरवाडी येथील टोलनाक्यावरील रुग्णवाहिकेवरील कर्मचाऱ्यांना कळविले असता. त्यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन गावकऱ्यांच्या मदतीने कारला जखमींच्या अंगावरून बाजूला काढून जखमींना तात्काळ पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ.शिवाजी पवार यांनी तपासून दोघास मृत घोषित केले आहे.या अपघाताची माहिती कळताच अपघातग्रस्त मयत पतिपत्नीच्या नातेवाईकांनी पाचोड ग्रामीण रुग्णालयात मोठी गर्दी केली होती.परिसरात या दुर्देवी घटनेबद्द हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत उशिरापर्यंत या घटनेची नोंद अंबड पोलीस ठाण्यामध्ये घेण्यात आलेली नव्हती.