Breaking News

Call - 7798589680. . . .8600682015. . . . . रिपब्लिकन वार्ता मुख्य संपादक डॉ.अनिल आठवले . . . कार्यकारी संपादक - सलीम सय्यद बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा - 7798589680. . . . 8600682015. . . . . Call - 7798589680. . . .8600682015. . . . . रिपब्लिकन वार्ता मुख्य संपादक डॉ.अनिल आठवले . . . कार्यकारी संपादक - सलीम सय्यद बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा - 7798589680. . . . 8600682015. . . . .

लोखंडी रॉडने सपासप १३ वार करत तरुणाला संपवलं

Responsive Ad Here
नाशिकमध्ये दिवसाढवळ्या हत्याकांड! सिन्नर फाट्यावरील घटना*
नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीचे प्रमाण वाढताना दिसत आहे. नाशिकमध्ये भरदिवसा दुचाकीवरुन जाणाऱ्या एका इसमाची तीन ते चार अज्ञात लोकांनी हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या हत्येचे कारणही अद्याप समजू शकलेले नाही. प्रमोद वाघ असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून एकूण तिघांनी त्याच्यावर हल्ला केला होता.काल संध्याकाळच्या सुमारास झालेल्या या घटनेने नाशिक परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, नाशिकरोड सिन्नर फाटा परिसरातील यश टायर्स या दुकानासमोर ही घटना घडली असून ३८ वर्षीय प्रमोद रामदास वाघ हे सायंकाळी सहाच्या सुमारास सर्व्हिस रोडने दुचाकीने जात होते. यावेळी संशयित योगेश पगारे आणि त्याच्या साथीदारांनी प्रमोद यांना अडवले . त्याने जुन्या भांडणाची कुरापत काढून वाद घालण्यास सुरुवात केली. त्यावेळी एकाने प्रमोद याच्यावर रॉडने हल्ला केला. त्यात ते गंभीर जखमी झाले. वार डोक्यात लागल्यामुळे ते जागेवर कोसळला. आरोपी योगेश पगारे याने एकापाठोपाठ एक असे १३ वेळा लोखंडी रॉडने त्यांच्या डोक्यात वार केला. सोबत असलेल्या मित्राने त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. पण तो काही ऐकण्याच्या परिस्थितीतच नव्हता.या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले होते. या हल्ल्याचा सीसीटीव्ही सध्या समोर आला असून हल्लेखोर अत्यंत निर्घृणपणे प्रमोद वाघ यांच्यावर हल्ला करताना दिसतोय. प्रमोद वाघ यांच्यावर हल्ला करून हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाला. तर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या प्रमोद वाघ यांना उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रमोद वाघ यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक होती. पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. हा हल्ला नेमका कशामुळे घडला याची अद्याप माहिती समजू शकलेली नाही. घटनेची माहिती मिळताच नाशिकरोड पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्याचे गुन्हे शाखेचे कर्मचारी हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. *रिपब्लिकन वार्ता वृत्त संकलन विभाग नाशिक*