Breaking News

Call - 7798589680. . . .8600682015. . . . . रिपब्लिकन वार्ता मुख्य संपादक डॉ.अनिल आठवले . . . कार्यकारी संपादक - सलीम सय्यद बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा - 7798589680. . . . 8600682015. . . . . Call - 7798589680. . . .8600682015. . . . . रिपब्लिकन वार्ता मुख्य संपादक डॉ.अनिल आठवले . . . कार्यकारी संपादक - सलीम सय्यद बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा - 7798589680. . . . 8600682015. . . . .

हातभट्टी दारू तयार करणाऱ्या अड्ड्यावर तसेच देशी-विदेशी दारूची अवैध विक्री करणाऱ्यावर छापेमारी

Responsive Ad Here
लातूर /देवणी प्रतिनिधी सगीर मोमीन
लातूर जिल्ह्यातील अवैध धंद्यावर प्रभावी कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम राबवून अवैध धंद्यावर कार्यवाही करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी दिले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून दिनांक 4 ऑगस्ट रोजी अचानकपणे लातूर जिल्ह्यातील लपून-छपून हातभट्टी तयार करणाऱ्या ठिकाणावर वरिष्ठांचे मार्गदर्शनात जोरदार कारवाई करत 72 गुन्हे दाखल करून अकरा लाख रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला होता. परत दिनांक 10 ऑगस्ट रोजी हातभट्टी तयार करणाऱ्या ठिकाणावर तसेच देशी-विदेशी दारूची अवैध विक्री व्यवसाय करणाऱ्यावर छापेमारी करून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अवैध धंद्यावर कार्यवाही करण्यासाठी राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेमध्ये 10 ऑगस्ट रोजी लातूर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील दुर्गम भागात लपून- छपून हातभट्टी तयार करून त्याची साठवणूक व विक्री करणाऱ्यावर तसेच देशी-विदेशी मद्याची अवैद्य विक्री व्यवसाय करणारे 42 इसमावर 41 गुन्हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत यामध्ये हातभट्टी, हातभट्टीचे रसायन, देशी विदेशी दारू असा एकूण 4 लाख 76 हजार 435 रुपयांचा मुद्देमाल जप्त व हातभट्टी दारू व हातभट्टीचे रसायन नष्ट करण्यात आले आहेत. अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस अधीक्षक सोमय मुंडे,अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे यांचे सूचना व मार्गदर्शनात लातूर पोलिसा कडून अवैध धंद्याविरुद्ध जोरदार कारवाई करण्यात येत असून सदरची कारवाई यापुढे ही सुरूच राहणार आहे.