Breaking News

Call - 7798589680. . . .8600682015. . . . . रिपब्लिकन वार्ता मुख्य संपादक डॉ.अनिल आठवले . . . कार्यकारी संपादक - सलीम सय्यद बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा - 7798589680. . . . 8600682015. . . . . Call - 7798589680. . . .8600682015. . . . . रिपब्लिकन वार्ता मुख्य संपादक डॉ.अनिल आठवले . . . कार्यकारी संपादक - सलीम सय्यद बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा - 7798589680. . . . 8600682015. . . . .

अतिवृष्टीने पूरबाधित झालेल्या शेतीच्या सुरक्षितेसाठी बोरगडी नाल्याची दुरुस्ती करा

Responsive Ad Here
*विदर्भ उपसंपादक राजेश ढोले यवतमाळ* दिनांक 1 सप्टेंबर 2024 रोजी पुसद तालुक्यात मोठ्या प्रामाणात अतिवृष्टी झाली. ह्यामध्ये पुसद तालुक्यातील बोरगडी, जुनी बोरगडी, कोप्रा, बोरी म येथील शेतकऱ्यांचे अतिशय नुकसान झाले आहे. त्यास कारणीभूत ठरलेल्या बोरगडी नाल्याचे खोलीकरण व सरळीकरण करून देण्याबाबत उपविभागीय अधिकारी पुसद यांना निवेदन देण्यात आले. इसवी सन 1963 साली बोरगडी नाल्याला सर्वात मोठा पुर आला होता, 1964 ला गावाचे पुंनरवसण झाले, तेव्हा पासून दर एक दोन वर्षा आड त्या नाल्याला अजूनही पुर येतो. आणि शेतीचे खूप प्रमाणात नुकसान होते. पुरबाधित असलेले क्षेत्र बोरी म 80 ते 90 एकर, बोरगडी, जुनी बोरगडी 120 ते 130 एकर, कोप्रा 30 ते 40 एकर आहे.
हया अगोदर सुद्धा महसूल विभागाकडे शेतकरी अर्जा‌द्वारे पिकांच्या नुकसाण व जमिनीच्या नुकसान भरपाई करिता अर्ज केले परंतु दरवेळी थातुर मातुर नुकसान भरपाई ही महसूल विभागा कडून वेळ मारून नेल्या जाते. सन 1980 पासून अनेक वेळा शासनाकडे नाला टरनिंग आणि खोलीकरन ड्रेसिंग मागणी करण्यात आली. त्याला कारणे देऊन शासनाकडून येथील शेतकऱ्यांची बोळवण केली आहे. सान 1990 ते 2000 ह्या दशकात नाला टरनिंग व खोलीकरन ड्रेसिंग शासनाकडून काही निधि (दुष्काळ ग्रस्त) मंजूर झाला होता परंतु शेलु शिवारातील नाला दुरुस्ती चे काम पुसद प. स. अंतर्गत सुरु बोरगडी नालयाचे काम मागे ठेवण्यात आले, व शेलू नाल्या चे काम पुढील काळात तीन वेळा परत केले. परंतु बोरगडी नाल्यासाठी निधी 2007उपलब्ध करून दिला नाही. महसूल विभाग व प. स. पुसद जुने रेकॉर्ड तपासल्यास ही बाब पुर्णपणे निदर्शनास येईल. अनेक वेळा बोरगडी नाल्या लगतचा भाग हा कनल (पुसधरण) कमांड एरियात येतो ह्या कारणास्तव महसूल विभागातील आधिकारी फंड उपलब्ध करता येत नाही असे सांगतात, परंतु शेलू लगत सुधा कणाल (canal) ओलीत होते तिथे तीन वेळा एकाच नाल्याचे टरनिंग व खोलीकरन ड्रेसिंग कसे झाले.
कमांड येरियाची अडचण असल्यास प्रत्यक्षात बोरगडी नाल्या लगत कुठेही कनल (canal) ओलीत होत नसून चाऱ्याच उपलब्ध नसतांना पुस प्रकल्पाचे आधिकारी व महसूल विभागाचे अधिकारी प्रत्यक्ष पाहणी करून हा यरिया कमांड मधून का वगळत नाहीत? असा आरोप गावकरी व शेतकऱ्यांनी केला आहे वरील सर्व गोष्टीचा विचार करून सध्याची नुकसान भरपाई देऊन भविष्यात टरनिंग व खोलीकरन ड्रेसिंग साठी शासकीय योजनेतून फंड उपलब्ध करून हे काम करणे अत्यंत जरूरी आहे. तेंव्हा विनंती की, पुसधरण सक्षम प्रकल्प अधिकारी तसेच महसूल आधिकारी यांनी प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक ती कार्यवाही करून शेतकऱ्यांना व गावकऱ्यांना वारंवार होणाऱ्या त्रासातून मुक्ति द्यावी. अशी विनंती निवेदनातून सर्व शेतकरी व गावकऱ्यांनी केली आहे. सदर निवेदन देते वेळेस अविनाश साखरे, दत्तराव मोटे, नथू करण, गजानन करण, वसंतराव पाईकराव, किसनराव साखरे, देवराव साखरे, बळीराम साखरे, बबन करण, नामदेव पुलाते, अतिश पुलाते, इत्यादींच्या सह्या आहेत. .