Video Post
Labels
Total Pageviews
मुख्य संपादक
माजी खा.इम्तियाज जलील यांची तिरंगा संविधान रॅली,रामगिरी महाराजांसह नितेश राणेंबाबत केली ‘ही’ मोठी मागणी
Responsive Ad Here
प्रतिनिधी सगीर मोमीन
छत्रपती संभाजीनगर ते मुंबईपर्यंत आज तिरंगा संविधान रॅली काढण्यात आली आहे. आज तिरंगा संविधान रॅली माजी खासदार, एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी आणि त्यांच्या समर्थकांकडून काढण्यात आली आहे. रामगिरी महाराज यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल एक वक्तव्य केलं होतं. या विरोधात जलील यांच्याकडून ही तिरंगा संविधान रॅली काढण्यात आली आहे. या रॅलीत हजारो मुस्लिम बांधव सहभागी झाले असून महंत रामगिरी महाराज आणि भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे. इतकंच नाहीतर ही तिरंगा संविधान रॅली मुंबईत दाखल झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना संविधान देण्यात येणार आहे. या रॅलीत जलील यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले, आजची ही तिरंगा रॅली आमची एमआयएम म्हणून निघालेली नाही तर आम्ही सर्व मुस्लिम बांधवांनी मिळून काढलेली आहे. आम्ही कोणत्याही जाती धर्माच्या विरोधात निघालेलो नाही तर हे कायद्याचं राज्य आहे. रामगिरी आणि नितेश राणे यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे, असं जलील म्हणाले.
*रिपब्लिकन वार्ता साठी विशेष प्रतिनिधी सगीर मोमीन छत्रपती संभाजी नगर औरंगाबाद*
Video Post
SidDhi Printers
न्युज पोर्टल, न्युज चॅनेल, वेब साठी संपर्क करा
8177881420