Video Post
Labels
Total Pageviews
मुख्य संपादक
राजेश टोपे यांनी मुस्लिम नेत्याशी चर्चा करावी-सयद तौफिक
Responsive Ad Here
पैठण प्रतिनिधी :-सुनील आडसुळ*
औरंगाबाद:- महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या विधानसभा संदर्भात माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे हे राष्ट्रवादीचे संपर्क प्रमुख आहेत मराठवाड्यातुन शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जास्त जागा निवडून येण्यासाठी हि जवाबदारी शरदचंद्र पवार यांनी त्यांच्याकडे दिली आहे व ते वरीष्ठ नेते आहेत मराठवाड्यातील विधानसभांच्या तिकीट संदर्भात शरदचंद्र पवार यांच्या अध्यक्षतेखाली सिल्व्हर ओक त्यांच्या निवासस्थानी बैठक झाली आहे या बैठकीसाठी शरदचंद्र पवार यांचे विश्वासू म्हणून ओळखले जाणारे राजेश टोपे हे उपस्थित होते औरंगाबाद जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे संपर्क प्रमुख म्हणून राजेश टोपे यांची पक्षाने नियुक्ती केलेली आहे औरंगाबाद शहरातील मध्य विधानसभा हा दलीत मुस्लिम मतदार असलेला मोठा भाग आहे या मतदारसंघात शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा येणाऱ्या विधानसभा मध्ये आमदार म्हणून निवडून येऊ शकतो तसेच जिल्ह्यातील तालुक्यातील गंगापूर.वैजापुर.पैठण फुलंब्री तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकत वाढली आहे राज्यात शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वावर दलीत मुस्लिम बहुजन समाज मोठ्या प्रमाणात विश्वास व्यक्त करत आहेत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा कडुन मुस्लिम समाजाच्या कार्यकर्त्यांला उमेदवारी देत असताना तो उमेदवार हिंदू.दलित. बौध्द बहुजन समाजातील मतदान घेऊन विधानसभामध्ये निवडुण येऊ शकतो का त्या उमेदवाराचा इतर सामाजाच्या जनसेवेत सहभाग आहे का हे उमेदवारी देत असताना याची दखल घेण्याची गरज आहे कारण की शरदचंद्र पवार यांच्यावर प्रेम करणारे लोक त्या मतदारसंघात असतात व राष्ट्रवादी पक्षाचे निष्ठावंत पदाधिकारी हि असतात शरदचंद्र पवार यांनी नियुक्ती केलेल्या राज्यातील राष्ट्रवादी पक्षाचे संपर्क जिल्ह्याचे प्रमुख वरिष्ठ नेत्यांनी यांच्याशी चर्चा न करता परस्पर दलाली करणाऱ्या व्यक्तीच्या शिफारशीनुसार त्या व्यक्तीला उमेदवारी दिल्यास तो उमेदवार पराभूत होऊ शकतो उमेदवारी देताना तो उमेदवार त्त्या मतदार संघातील सर्व समाजाच्या लोकांच्या मनातील असला पाहिजे व त्या ठिकाणी असलेले महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांच्या चर्चातुन हा उमेदवार असायला हवा तरच तो विजयी होऊ शकतो जनतेच्या व पक्षातील कार्यकर्त्याच्या मनांच्या विरोधात दिलेला उमेदवार हा त्या मतदारसंघात पराभूत होऊ शकतो औरंगाबाद शहरातील मध्य विधानसभा मधुन मुस्लिम समाजाला उमेदवारी देण्यात यावी तो उमेदवार हिंदू दलीत बौध्द ख्रिश्चन बहुजन समाजाच्या व शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या चर्चा करूनच त्याला उमेदवारी देण्यात यावी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संपर्क प्रमुख असलेले माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी औरंगाबाद मध्ये वेळ काढुन पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी यांच्याशी चर्चा करावी मी राजेश टोपे यांच्याशी बर्याच वेळी फोनवरून चर्चा केली आहे परंतु त्यानी वेळ काढुन औरंगाबादच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा करावी अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय सरचिटणीस सय्यद तौफीक यांनी दिली आहे
Video Post
SidDhi Printers
न्युज पोर्टल, न्युज चॅनेल, वेब साठी संपर्क करा
8177881420