Video Post
Labels
Total Pageviews
मुख्य संपादक
पूर्णेत धनगर समाजाकडून रास्ता रोको आंदोलन
Responsive Ad Here
पूर्णा परभणी प्रतिनिधी सलीम सुहागनकर*
पूर्णा :-शहरासह तालुक्यातील सकल धनगर समाजाच्या वतीने दिनांक २२ सप्टेंबर रोजी शहराजवळील राष्ट्रीय महामार्ग क्र.६१पूर्णा- नांदेड ताडकळस फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आंदोलनादरम्यान राज्य सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या धनगर समाजाला एसटी आरक्षणाची तात्काळ अमलबजावणी करा मुंबई उच्च न्यायालयात धनगर एसटी आरक्षणाची केस सुरू आहे त्यामध्ये धनगड अस्तित्वात नाहीत असे राज्य सरकारने शपथपत्र दिले होते परंतु छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील बाबरा येथील खिल्लारे नावाच्या धनगर बांधवांनी बनावट दाखले काढल्याने धनगराची राज्यातील शून्य संख्या अमान्य केली म्हणून राज्य सरकारने तात्काळ धनगरांचे दाखले रद्द करावेत आदिवासी जमातीच्या ७९% आरक्षणाला धक्का लागू नये ही समस्या धनगर जातीची भावना आहे आदिवासी जमातीचे ७९ टक्के आरक्षण आरक्षण म्हणजे राजकीय लोकप्रतिनिधित्व शिक्षण नोकरी राज्यातील व केंद्रातील बजेट याला कोणताही धक्का लागू नये धनगर जातीच्या एसटी आरक्षण आपण बजावणीचा जीआर राज्य सरकारने तात्काळ काढून महाराष्ट्रातील जिल्हाधिकाऱ्यांना निर्गमित करावा व धनगर जमात राज्यात अस्तित्वात नसून अनुसूचित जातीच्या यादीत ३६ नंबरला धनगर ऐवजी धनगर असे गृहीत धरून धनगर जमातीला अनुसूचित जातीचे दाखले वितरित करण्यात यावेत सुप्रीम कोर्टात पंजाब सरकार विरुद्ध दरविंदर सिंग या केस मध्ये सहा विरुद्ध एक असा दि.१ऑगस्ट २०२४ रोजी न्या धनंजय चंद्रचूड यांच्या बॅचने देशातील अनुसूचित जाती अनुसूचित जमाती यांच्या जातीमध्ये उप वर्गीकरण करण्यास मान्यता दिली असून त्यांचे अधिकार राज्य सरकारने दिले आहेत सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे मूळ आदिवासी अनुसूचित जातीचे आरक्षणाला कोणत्याही धक्का लागत नाही आदिवासी जमातीचे आरक्षण सात टक्के आहे त्यांना राज्य सरकारने अ एस टि ए असे समजावे याचे सर्व अधिकार हक्क सुरक्षित करावे. मूळ आदिवासी जमातीचे आरक्षणावरती आक्रमक करणे घुसखोरी करणे त्यांचे अधिकार हक्क हिसकावून घेणे अशी धनगर समाजाची भावना नाही धनगर समाज वर्तमान परिस्थितीमध्ये भटक्या जमाती क परोपरातील ३.५% आरक्षण लागू आहे अनुसूचित जमाती आरक्षणाची अंमलबजावणी झाल्यानंतर धनगर जमातीचे भटक्या जमाती क प्रवर्गातील ३.५% आरक्षण अनुसूचित जमाती ब एस टी बी असे करण्यात यावे त्यामुळे मूळ आदिवासी वर कोणत्याही अन्याय होणार नाही राज्य सरकारने राज्यातील धनगर जमातीच्या तीन भावनेंचा आदर करून एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करावी अशा मागण्यांची निवेदन तहसीलदार यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेद पाठवण्यात आले त्यावेळी नारायणराव पिसाळ मारोतराव बखाल विश्वनाथ होळकर बंडू आप्पा बनसोडे जगन्नाथ रेनगडे आप्पा बनसोडे माधव बनसोडे बालाजी वैद्य रवींद्र वैद्य लक्ष्मण बारकड बबलू माने माणिक हजारे वैभव ढोंगे कन्हैया धडकंडे गजानन माने नारायण पारटकर पांडुरंग पारटकर संतोष पारटकर नवनाथ रौंदळे सैनाजी माठे सह सकल धनगर समाज बांधव रास्ता रोको आंदोलनात सहभागी झाले होते आंदोलनादरम्यान पोलीस निरीक्षक विलास गोबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली चौक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता त्याप्रसंगी अति आवश्यक वाहनांना सूट देण्यात आली होती
Video Post
SidDhi Printers
न्युज पोर्टल, न्युज चॅनेल, वेब साठी संपर्क करा
8177881420