Breaking News

Call - 7798589680. . . .8600682015. . . . . रिपब्लिकन वार्ता मुख्य संपादक डॉ.अनिल आठवले . . . कार्यकारी संपादक - सलीम सय्यद बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा - 7798589680. . . . 8600682015. . . . . Call - 7798589680. . . .8600682015. . . . . रिपब्लिकन वार्ता मुख्य संपादक डॉ.अनिल आठवले . . . कार्यकारी संपादक - सलीम सय्यद बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा - 7798589680. . . . 8600682015. . . . .

पैठण मधील दुसऱ्या संत चोखामेळा साहित्य संमेलनाचा समारोप,संतांचे साहित्य हजारो काळ टिकणारे आहे - डॉ.सांगळे

Responsive Ad Here
पैठण प्रतिनिधी-सुनील आडसुळ*
महाराष्ट्रतील संतांचे साहित्य हजारो काळ टिकणारे आहे, ते बहुअंगी आहे. त्याने प्रत्येक माणसाला जगण्याची पद्धत शिकवली आहे. ते त्रिकालाबाधित आहे. संत साहित्य विपुल आहे. भारुड, अभंग, काव्य, ओव्या, गाथा असे अनेक प्रकार त्यांनी आम्हाला दिले, असे प्रतिपादन संमेलनाध्यक्ष डॉ संदीप सांगळे यांनी संमेलनाच्या समारोप प्रसंगी व्यक्त केले. संत चोखामेळा यांच्या परिवाराला साडेसातशे वर्षानंतर न्याय या संमेलनाच्या रूपाने मिळाला असे ही ते म्हणाले. ज्या चोखामेळा यांच्या घरातील सगळेच संत असताना ते अस्पृश्य का राहतात? असा सवाल खडा करताना त्यांनी चोखामेळा परिवारातील पत्नी सोयराबाई, बहीण निर्मळा, मेहुणा बंका आणि मुलगा कर्णमेळा यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. नामदेव आणि ज्ञानदेवांच्या मांदियाळीतील संत चोखामेळा दुर्लक्षितच राहिले,अशी खंत त्यांनी व्यक्त केली.मात्र पैठण मधील दुसऱ्या संत चोखामेळा साहित्य संमेलनाने पुन्हा चोखामेळा प्रकाशात येत आहेत. समरोपा प्रसंगी समारोपाच्या अध्यक्ष शेषाद्री अण्णा डांगे, संत चोखामेळा अध्यासन केंद्राचे संस्थापक सचिन पाटील,स्वागताध्यक्ष संतोष तांबे, प्रमुख पाहुणे श्रीदत्तोपसक, प्रा.चंद्रकांत भराट यांचे समयोचित भाषण झाले. सूत्रसंचालन श्री अनिल देशमुख यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राचार्य संदीप काळे यांनी मांडले. सर्वांची भावपूर्ण मनोगते झाली. संमेलन यशस्वी करण्यासाठी रामदास रामावत, प्रा. संतोष गव्हाणे, सुनील चितळे, सुभाष शिंदे, सारिका धोकटे,
डॉ.जालिंदर येवले,विष्णू ससाने,उषा सोनवणे, लता पवार यांनी विशेष परिश्रम घेतले.