Video Post
Labels
Total Pageviews
मुख्य संपादक
धनगर जमातीच्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी व एसटी प्रमाणपत्र त्वरित द्या- सकल धनगर समाज भोकर
Responsive Ad Here
भोकर / ज्योती सरपाते
महाराष्ट्र राज्यात धनगर जमाथ मोठ्या प्रमाणावर असुन या समाजाचा मेंढीपाळ व्यवसाय असुन ते पशुपालक आहेत.या जमातीचे राज्य घटनेच्या संविधानात क्र.३६ वर असुनही गेल्या ७६ वर्षांपासून धनगर आरक्षणाची अंमलबजावणी होत नाही.त्यामुळे राज्यात अनेक धनगर मावळे उपोशन करीत असुन मुख्यमंत्री यांनी धनगर आरक्षणाची अंमलबजावणी व एसटी चे प्रमाणपत्र त्वरित देऊन धनगर जमातीला दिलासा द्यावा अशा आशयाचे निवेदन भोकर येथील तहसीलदारांना देण्यात आले आहे.
भोकर तालुका धनगर समाजाच्या वतीने दि. २३ नोव्हेंबर २०२४ रोजी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, राज्यात पशुपालन व्यवसाय करणारी जमात म्हणून धनगर आकडे पाहिले जाते.पशुपालक असलेल्या या जमातीला घटना तज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धनगर जमातीची अवस्था पहाता त्यांनी इ.स.१९५६ मध्ये राज्य घटनेच्या संविधानात महाराष्ट्रातील अनुसुचित जमातीच्या यादीत अनु.क्र.३६ वर धनगर जमातीचा समावेश केला आहे.पण येथे 'र' चा 'ड' करुन धनगर ऐवजी 'धनगड' म्हणून केला यामुळे धनगर जमात त्यांच्या संवैधानीक हक्कापासून गेली ७४ वर्षे वंचित ठेवले आहे.वास्तवीक धनगड नावाची जमात देशातच काय, जगात कुठेच अस्तित्वात नाही.तसा लेखी अहवाल ही शासनाने मा.मुंबई उच्च न्यायालयात लिहून दिले.तरी पण शासन स्तरावर काहीच दिसत नाही.त्यामुळे या आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी अन् एसटी प्रमाणपत्र त्वरित द्यावे. यासाठी राज्यभर आंदोलन सुरू असुन यात पंढरपुर,नेवासा,लातुर येथे मल्हार योध्दे राज्य स्तरीय आमरण उपोषणाला बसले आहेत.यावेळी मुख्यमंत्री धनगर समाजाची बैठक घेऊन धनगर व धनगड एकच असल्याचा जीआर काढुन एसटी प्रमाणपत्र देण्याचे आश्वासन दिले.पण कोठे माशी शिंकली कोण जाणे पण अजुन तरी उपोषणकर्त्याकडे पाठ फिरवली असल्याने धनगर जमातीत सरकार विषयी उद्रेकाची भावना निर्माण होऊन दि.२३ सप्टेंबर रोजी महाराष्ट्रात रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे.त्यामुळे मुख्यमंत्री साहेब धनगर समाजाच्या भावनाशी न खेळता विधान सभेची आचार संहिता पुर्वी एसटी आरक्षणाची अंमलबजावणी व एसटी प्रमाणपत्र द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे.या निवेदनावर जेष्ठ नेते नागोराव शेंडगे बापू, सुभाष नाईक किनीकर,सुशिल शिंदे, नागोराव बिरगाळे,देवबा शिळेकर, मारोती वरणे, खंडेराव शेंडगे,राज हाके, पंकज चोंडे,बळी माने, साईनाथ धानोरे,मानेजी डांगरे, दिगाबंर खिरे,बाळु धानोरे,हानम़त हुलगुंडे,राजु नरोटे,जळबा गायकवाड,अनिल बिरगाळे,सतीश माने आदींच्या सह्या आहेत.
Video Post
SidDhi Printers
न्युज पोर्टल, न्युज चॅनेल, वेब साठी संपर्क करा
8177881420