Video Post
Labels
Total Pageviews
मुख्य संपादक
प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर वलांडीतील उपोषण स्थगित
Responsive Ad Here
प्रतिनिधी सगीर मोमीन
लातूर :-देवणी तालुक्यातील वलांडी येथील 1 ऑक्टोंबर 2024 पासून सुरू असलेला वलांडी ग्रामपंचायत समोरील आमरण उपोषण जनतेच्या भौतिक सुविधा पुरविण्यास समर्थ असल्याने उपोषण सुरू करण्यात आला होता गेले तीन दिवस आमरण उपोषण सुरू होते त्या काळात कोणीच प्रशासनाचा अधिकारी व कर्मचारी उपोषण स्थळी भेट न दिल्याने दिनांक 3 ऑक्टोंबर 2024 ला उपोषण कर्ते सामूहिक आत्मदहन करणार असल्याचा संदेश जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर यांना ईमेलद्वारे संदेश देताच जिल्हाधिकारी यांनी संबंधित अधिकारी यांना तात्काळ आदेश दिल्याने तालुका दंडाधिकारी, गटविकास अधिकारी व पोलीस निरीक्षक यांनी उपोषण स्थळी भेट देऊन त्या उपोषणकर्त्यासोबत जवळपास दोन तास चर्चा करून प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केले व तालुका दंडाधिकारी नी संबंधित गटविकास अधिकाऱ्यांना सूचना दिल्याने त्यांचे पालन करून गटविकास अधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांचे एक ते तेरा मागण्याचे लेखी आश्वासन देऊन त्या मागण्याचे निर्णय येत्या काही दिवसात पूर्ण करण्याचा आश्वासन दिल्याने उपोषण कर्ते शेख अजीम व आसिया रिजवी यांना तहसीलदार व गटविकास अधिकारी यांच्या हस्ते लिंबू पाणी पाजवुन उपोषण स्थगित केले या उपोषणात सर्वश्री सौदागर महमदरफी पाशामियाॅं संस्थापक अध्यक्ष अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती, दत्ता डुब्बे शेतकरी सेल तालुकाध्यक्ष व धनराज बिरादार माजी तंटामुक्ती अध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार अजिज सौदागर, सगीर मोमीन पत्रकार व सिद्धेश्वर बनाळे वाईस चेअरमन, इसराइल तांबोळी आदी उपोषणात सहभागी होते.
Video Post
SidDhi Printers
न्युज पोर्टल, न्युज चॅनेल, वेब साठी संपर्क करा
8177881420