Video Post
Labels
Total Pageviews
मुख्य संपादक
कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय जिंतूर येथे एक दिवाळी आनंदाची देऊया स्नेहाची कार्यक्रमाचे आयोजन
Responsive Ad Here
घेता घेता देणाऱ्याचा वसा घ्यावा-भेट देऊया स्नेहाची कार्यक्रमाचे आयोजन गटशिक्षणाधिकारी-त्र्यंबक पोले*
परभणी /जिंतूर प्रतिनिधी मुजीब सिद्दीकी*
जिंतूर:-ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कवी विं दा करंदीकर यांच्या देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे घेता-घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे.
या कवितेचा दाखला देत गटशिक्षणाधिकारी त्र्यंबक पोले यांनी देणाऱ्याचा वसा आपण सर्वांनी घेतला पाहिजे असे संबोधित केले. संवेदनशील मनाने आणि उदारतावादी दातृत्व भावनेने शिक्षण विभाग जिंतूरने जमा केलेल्या सामाजिक निधी मधून हा स्तुत्य, अनुकरणीय उपक्रम संपन्न होत आहे. हा उपक्रम मला राबविता आला हे माझ्यासाठी अत्यंत भाग्याचे आहे. असे गौरवोद्गार आजच्या प्रसंगी त्र्यंबक पोले यांनी काढले. दिनांक 26 ऑक्टोंबर 2024 रोजी कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय जिंतूर येथे “एक दिवाळी आनंदाची भेट देऊया स्नेहाची” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. “एक दिवाळी आनंदाची भेट देऊया स्नेहाची” या उपक्रमांतर्गत कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, जिंतूर आणि RMSA वस्तीगृहातल्या 235 बालिकांना दिवाळी सणानिमित्त “शिक्षण विभाग जिंतूरच्या” पुढाकारातून एक मनपसंत ड्रेस भेट देण्याचा सामाजिक संकल्प करण्यात आला. हा संकल्प पूर्ण करण्यासाठी जिंतूर तालुक्यातील सर्व शिक्षक, शिक्षण विभागात कार्यरत असणारे सर्व कर्मचारी तसेच सर्व क्षेत्रातून ऐच्छिक स्वरूपात निधी संकलित करण्यात आला. या संकलित निधीमधून सर्व मुलींना त्यांच्या पसंतीने ड्रेस खरेदी करुन आजच्या भरगच्च कार्यक्रमांमध्ये या मनपसंत ड्रेस आणि फराळाचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला गटशिक्षणाधिकारी त्र्यंबक पोले, केंद्रप्रमुख मारुती घुगे, दिनकर घुगे,निलेश लटपटे गट साधन केंद्रातील वरिष्ठ सहाय्यक राजेंद्र ढाकणे सर, लक्ष्मण टाकणसार, शिक्षक संघटना प्रतिनिधी दिनकर चौधरी, दत्तराव पोले, वसंतराव इंगोले, अब्दुल माजीद यांची उपस्थिती होती. मार्गदर्शन करताना गटशिक्षणाधिकारी त्र्यंबक पोले यांनी मागच्या दोन वर्षांपासून पासून हा उपक्रम तालुक्यात राबविण्यात येत आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी श्रीमती आचल गोयल मॅडम यांच्या संकल्पनेतून मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी यांच्या प्रेरणेने तत्कालीन गटशिक्षणाधिकारी गणेश गांजरे यांनी या उपक्रमाची जिंतूर तालुक्यात मुहूर्तमेढ केली. या स्तुत्य आणि संवेदनशीलता जागा ठेवणारा दातृत्ववान सामाजिक उपक्रम याही वर्षी राबविण्याचे आम्ही ठरविले. या उपक्रमा पाठीमागील भूमिका, पार्श्वभूमी, रूपरेषा आणि आजचा प्रत्यक्ष यशस्वी कार्यक्रम संपन्न करण्यासाठी घ्यावी लागलेली मेहनत याविषयी सविस्तर माहिती सांगितली. या संपूर्ण कार्यात माझे सहकारी शिक्षण विस्तार अधिकारी ज्ञानोबा साबळे, मंगेश नरवाडे, नवनीत देशमुख, कार्यालयीन कर्मचारी, सर्व केंद्रप्रमुख, सर्व शिक्षक संघटना पदाधिकारी, सर्व मुख्याध्यापक, सर्व शिक्षक यांच्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम होत आहे. हे ही सांगितले. निवेदन करणाऱ्या मयूर जोशी यांच्या काव्यात्मक निवेदनाने द्वारे या निधी संकलनाच्या कार्यात सहभागी झालेल्या सर्वांचे ऋण व्यक्तकेले या कार्यकर्मासाठी निधी संकलित करणारे दाते आहेत म्हणून हा कार्यक्रम संपन्न होत आहेअसे ही ते म्हणाले .सदर कार्यक्रमात तालुक्यातील शिक्षकांच्या वतीने दिनकर चौधरी, दत्तराव पोले, वसंतराव इंगोले, केंद्रप्रमुख मारुती घुगे,श्रीमती सुनिता मगर यांनी हृदयस्पर्शी मनोगत व्यक्त केले. विद्यार्थिनीच्या वतीने बऱ्याच विद्यार्थिनी उत्स्फूर्त मनोगत व्यक्त केले. सर्वांनी आमच्यासाठी घेतलेल्या मेहनती बद्दल ऋण व्यक्त केले. सर्व मुलींना मनपसंत ड्रेस मिळाल्याचा आनंद आणि दिवाळी फराळाची गोडी स्पष्टपणे जाणवली,नेहमीप्रमाणे आपल्या बहरदार काव्यात्मक शैलीमध्ये साहित्यिक मयूर जोशी यांनी सूत्रसंचालन करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. आपल्या भावस्पर्शी शैलीने प्रभाकर नालंदे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. एकंदरीत संपूर्ण कार्यक्रम उत्साहात, शिस्तबद्ध पद्धतीने संपन्न झाला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंचावरील उपस्थितांसोबत वैजनाथ प्रधान, सचिन चव्हाण,भास्कर मुंडे, नितीन पेठे, फड, मुख्याध्यापिका श्रीमती राठोड, श्रीमती मुळे, श्रीमती अंभोरे, श्रीमती इंगोले, शिंदे, सुनील फड, श्रीमती सुनिता मगर, संजय माहोरे, पाटील, यांच्यासह सर्व केंद्रप्रमुख,सर्व उच्चश्रेणी मुख्याध्यापक,सर्व शिक्षकांनी मेहनत घेतली.
Video Post
SidDhi Printers
न्युज पोर्टल, न्युज चॅनेल, वेब साठी संपर्क करा
8177881420