Video Post
Labels
Total Pageviews
मुख्य संपादक
पुणे येथून वैभव देवरे यास खंडणीप्रकरणी गुंडा विरोधी पथकाने घेतले ताब्यात
Responsive Ad Here
अवैध सावकार वैभव देवरे पिंपरी चिंचवडमधून ताब्यात*
नाशिक विशेष प्रतिनिधी अनिल केदारे
नाशिक :-कर्जदाराकडून अवाजवी व्याजवसुली करूनही पुन्हा दररोज सव्वा लाख रुपयांच्या व्याजाची मागणी करून कर्जदारास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अवैध सावकार वैभव देवरेसह इतर दोघांविरोधात गुन्हा दाखल आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून वैभव फरार होता. त्यास गुन्हे शाखेने पिंपरी चिंचवड येथून ताब्यात घेतले आहे. दुसऱ्याच्या नावे भाडेतत्वाने घेतलेल्या फ्लॅटमध्ये राहत असल्याचे निष्पन्न झाले.
गंगापूर रोडवरील सहदेव नगर परिसरात राहणाऱ्या धीरज विजय पवार यांनी नांदुरी घाटातील जंगलात गळफास घेतला होता. पवार यांचा डी.एस.पी. बासुंदी चहा नावाने जिल्ह्यात व्यवसाय आहे. पवार यांच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीनुसार, धीरज पवार यांनी वैभव देवरेकडून १२ लाख रुपये व्याजाने घेतले होते. नियमीत कर्ज फेड केल्यानंतर एक महिन्याची कर्ज फेड करण्यास उशीर झाला. त्यावेळी वैभव देवरेसह त्याची पत्नी सोनाली देवरे (रा. चेतना नगर) व शालक निखील पवार (राणेनगर) यांनी धीरज पवार यांचा शारीरीक व मानसिक छळ केला. दमदाटी, मारहाण करीत ३२ लाख रुपये दे किंवा शेतजमीन नावावर करून दे अशी मागणी केली. सततच्या छळाला कंटाळून धीरज पवार यांनी आत्महत्या केली. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास करीत सोनाली देवरे व निखील पवार यांना अटक केली. तर वैभव देवरे हा मोबाइल घरात ठेवून पसार झाला हाेता. त्याचा गुन्हे शाखा तपास करीत होते. अखेर खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे वैभव देवरे हा पिंपरी चिंचवड मध्ये लपल्याचे उघड झाले. त्याच्या अटकेनंतर या गुन्ह्याच्या तपासास गती मिळणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच वैभव देवरे व इतर सावकारांविरोधात तक्रार असल्यास नागरिकांनी पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन शहर पोलिसांनी केले आहे.
धीरज पवार यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अटकेत असलेले संशयित सोनाली देवरे, निखिल पवार यांच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानुसार न्यायालयाने तपास करण्यासाठी दोघांच्या कोठडीत शनिवारपर्यंत वाढ केली आहे.
सदरची कामगिरी नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अचल मुदगल, यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोलीस उपनिरीक्षक मंगल गुंजाळ,पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी, सुनील आडके, प्रदीप ठाकरे,गणेश भागवत,अक्षय गांगुर्डे,प्रवीण चव्हाण, अशोक आघाव, राजेश राठोड, सुनील कवडे यांच्यासह तांत्रिक विश्लेषण विभागाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक जयश्री तारडे आदींनी केली आहे.
*रिपब्लिकन वार्ता साठी विशेष प्रतिनिधी अनिल केदारे नाशिक*
Video Post
SidDhi Printers
न्युज पोर्टल, न्युज चॅनेल, वेब साठी संपर्क करा
8177881420