Video Post
Labels
Total Pageviews
मुख्य संपादक
संगीताताई अशोकराव पाटील निलंगेकर जरांगे पाटलाच्या भेटीला
Responsive Ad Here
लातूर प्रतिनिधी सगीर मोमीन
लातूर : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून २० नोव्हेंबर ला मतदान व 23 ला निकाल आहे . यासाठी 22 ते 29 ऑक्टोबर दरम्यान उमेदवारी अर्ज व 04 नोव्हेंबर ला अर्ज वापस घेण्याचा कालावधी आहे. या विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजताच राज्यातील सर्वच पक्ष जोमाने कामाला लागले आहेत. लोकसभा निवडणुकीत अनेकांना मराठा मतांचा फटका बसला होता. त्यामुळे आता सर्वच पक्षातील आमदार, नेते तसेच निवडणुकीसाठी रिंगणात उतरलेले उमेदवार मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेताना दिसत आहेत. यामुळे अंतरवाली सराटीत राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
*माजी मुख्यमंत्र्याच्या सूनेने घेतली भेट*
दिवंगत मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या सुनबाई संगीता निलंगेकर यांनी नुकतंच मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. काँग्रेसकडून निलंगा विधानसभेसाठी त्यांचे पती अशोकराव निलंगेकर इच्छुक होते. मात्र निलंग्याची जागा काँग्रेसकडून अभय साळुंके यांना सुटल्याने संगीता निलंगेकर नाराज आहेत. यामुळे संगीता निलंगेकर यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याकडून उमेदवारीची अपेक्षाही व्यक्त केली. मनोज जरांगे पाटील आणि संगीता निलंगेकर यांच्यात विविध मुद्द्यांवर चर्चा झाली.
Video Post
SidDhi Printers
न्युज पोर्टल, न्युज चॅनेल, वेब साठी संपर्क करा
8177881420