Video Post
Labels
Total Pageviews
मुख्य संपादक
रेशन दुकानदारांचा संप अखेर तूर्तास स्थगित
Responsive Ad Here
लातूर प्रतिनिधी सगीर मोमीन
लातूर :-राज्यातील रास्त भाव दुकानदार यांच्या प्रलंबित विविध मागण्या राज्य शासन मान्य करत नव्हते. १ ऑक्टोबर रोजी अमरावती येथे शिखर परिषद आयोजित करण्यात आले होते. राज्यातील दोन्ही संघटना एकत्री राज्यव्यापी १ नोव्हेंबर पासून रेशन धान्य वाटप बंद आंदोलनाची भूमिका नाईलाजने महाराष्ट्र राज्यातील ५६ हजार रास्त भाव दुकानदार यांच्या न्याय हक्कासाठी शिखर परिषद मध्ये घ्यावे लागले होते. त्या दरम्यान निवडणूक आयोगाकडून विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागू करण्यात आले. शासनाने आता पर्यंत अनेक वेळेस राज्यस्तरावर विविध बैठका मंत्रालयात होऊन सुद्धा कुठलाही मार्ग निघाले नाही. राज्य शासनाच्या विरोधात आंदोलनाच्या बंड पुकारण्यात आले होते, त्यातच आचारसंहिता लागू झाले आचारसंहितेच्या काळात सुद्धा राज्यातील रास्त भाव दुकानदार यांच्या सर्वांनी मते आंदोलनाची पवित्रता घेण्यात आले होते. दि 24 नोव्हेंबर रोजी आदर्श आचारसंहितेच्या नियमावलीप्रमाणे निवडक पाच संघटनेच्या प्रतिनिधी सोबत रणजितसिंह देओल प्रधान सचिव अन्न, नगरी व पुरवठा विभाग सोबत बैठक घेण्यात आली होते. या बैठकीस कोळेकर साहेब सहसचिव अन्न व नागरी पुरवठा विभाग हे सुद्धा यावेळी उपस्थित होते. महासंघाचे राज्यअध्यक्ष डी. एन. पाटील, फाउंडेशनचे राज्य अध्यक्ष गणपतराव डोळसे पाटील, महासंघाचे जनरल सेक्रेटरी कॉम्रेड चंद्रकांत यादव, महासंघ राज्य उपाध्यक्ष राजेश अंबुसकर, महासंघ सचिव विजयकुमार पंडित, कौस्तुभ जोशी उपस्थित होते.
केंद्रशासनाकडून 2022 मध्ये 20 रुपये प्रति क्विंटल मार्जिनची रक्कम वाढ करून देण्यात आले होत. ती रक्कम राज्य शासनाकडे 2022 पासून त्यांच्याकडे जमा आहे. राज्य शासनाने तीनशे रुपये प्रति क्विंटल मार्जिनची रक्कम देण्यात यावे. यास विविध प्रमुख मागणी साठी मंत्रालय मुंबई येथे अनेक बैठका होऊन कुठलाच मार्ग निघाले नसल्यामुळे धान्य वितरण बंद आंदोलन पुकरण्यात आले होते. प्रधान सचिव यांनी अश्वासीत केले, विधानसभेच्या निवडणुकी नंतर येणाऱ्या शासनाच्या समोर दोन आठवड्यांच्या आता रास्त भाव दुकानदार संघटनेची बैठक लावून प्रश्न मार्ग काढू असे आश्वासित केल्यानंतर राज्यातील रास्त भाव दुकानदार यांच्या संप अखेर मागे घेण्यात आल्याची माहिती यावेळी बोलताना नितीन देशमुख यांनी सांगितले.
" मंत्रालयात प्रधान सचिव यांच्या बैठकी नंतर विविध मागणीसाठी 1नोव्हेंबर पासून धान्य उचल करणे, धान्य वाटप व रेशन दुकान बंद आंदोलन करण्यात येणार होते. राज्यातील रेशन दुकानदार यांचे आंदोलन दोन्ही संघटनेचा उपस्थित पदाधिकारी यांच्या एक मताने अखेर दिवाळी सणातील रेशन वितरण बंद आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आले - नितीन देशमूख देवणी तालुका अध्यक्ष महासंघ "
Video Post
SidDhi Printers
न्युज पोर्टल, न्युज चॅनेल, वेब साठी संपर्क करा
8177881420