Video Post
Labels
Total Pageviews
मुख्य संपादक
रतन टाटांचं निधन; ८६ व्या वर्षी प्राणज्योत मालवली; दानशूर उद्योगपती हरपला
Responsive Ad Here
रतन टाटांचं निधन; ८६ व्या वर्षी प्राणज्योत मालवली; दानशूर उद्योगपती हरपला
मुंबई: ख्यातनाम उद्योगपती रतन टाटा यांचं निधन झालं आहे. वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. टाटा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं वृत्त सोमवारी आलं होतं. त्यानंतर रतन टाटांनीच त्यांच्या प्रकृतीबद्दलची माहिती दिली होती. वाढत्या वयामुळे नियमित वैद्यकीय तपासणी होत असल्याचं टाटांकडून सांगण्यात आलं होतं. आज संध्याकाळी त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं वृत्त आलं. त्यानंतर त्यांच्यासाठी देशभरातून प्रार्थना सुरु होत्या. आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. काही वेळापूर्वी त्यांची प्राणज्योत मालवली
Video Post
SidDhi Printers
न्युज पोर्टल, न्युज चॅनेल, वेब साठी संपर्क करा
8177881420