Video Post
Labels
Total Pageviews
मुख्य संपादक
पुसद शहर पोलिसांकडून अवैध दारूच्या साठ्यावर मोठी कारवाई,पुसद पोलिसांकडून सात लाख 95 हजार रुपयांचा मुद्देमाल करण्यात आला जप्त
Responsive Ad Here
विदर्भ उपसंपादक राजेश ढोले
पुसद विधानसभा निवडणुक २०२४ चे पार्श्वभुमीवर पुसद पोलीस ठाण्याकडुन अवैध दारुच्या साठ्यावर मोठी कारवाई.दि. १४ नोव्हेंबर रोजी पोलीस स्टेशन पुसद शहर पोलीसांना खबऱ्यांमार्फत गुप्त माहीती मिळाली की, नविन पुसद परिसरात बोरगडी रोडच्या परमेश्वर ब्रिजलाल जयस्वाल, वय अंदाजे ५५ वर्षे, रा. नविन पुसद यांचे घरात अवैधरीत्या देशी दारुचा साठा विक्रीकरीता करुन ठेवलेला आहे.
याबाबत मिळालेल्या माहीतीवरुन सदर घराची घरझडती घेवुन कायदेशीर कारवाई करण्याकरिता पोलीस अधीक्षक कुमार चिंता,अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन बिजे यांच्या मार्गदर्शनाखाली पुसद शहर पोलीस ठाण्याचे पोलीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश बेसरकर व त्यांचे पथक सहाय्यक पोलीस निरीक्षक धिरज बांडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमकुमार केदार, पोलीस उपनिरीक्षक किशोर खंडार, पोलीस उपनिरीक्षक नगीना बी. शेख, पोलीस हेडकॉन्स्टेबल जलाल शेख, पोलीस हेडकॉन्स्टेबल गजानन पोले, पोलीस नाईक दिनेश सोळंके, पोलीस कॉन्स्टेबल नितेश भालेराव,विशाल दातीर, महिला पोलीस नाईक शितल चक्रनारायण, वाहन चालक पोलीस नाईक सुनिल ठोंबरे,पोलीस कॉन्स्टेबल मनोज कदम यांनी शासकीय पंचासमक्ष परमेश्वर ब्रिजलाल जयस्वाल यांच्या नविन पुसद परिसरातील घरी जावुन दारुबाबत कायदेशीर घराची झडती घेतली.
घरामधील पुर्वेकडील एका रुममध्ये भींतीलगत देशी दारु बॉबी संत्रा चे १७० खोके (बॉक्स) प्रत्येक खोक्यामध्ये देशी दारु बॉबी संत्रा ९० मि.ली. च्या १०० बॉटल, प्रत्येकी नग किंमत ३५/- रुपये प्रमाणे एका खोक्यामध्ये ३५००/- रुपयाच्या बॉटल असा एकुण ५,९५,०००/- रुपयाचा देशी दारुचा मुद्देमाल अवैधरीत्या घरात साठवणुक केलेला मिळुन आला तसेच आरोपीने गुन्हयात वापरलेली मोटर सायकल असा एकुण ७,९५,०००/- रुपयाचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करण्यात आला आहे. पुसद शहर पोलीस ठाणे यांच्याकडुन आगामी विधानसभा निवडणुक संबंधाने अवैध दारु, अवैध गुटखा यावर कारवाई करण्यात आलेली असुन त्यामध्ये ही अवैध दारुची मोठी कारवाई पोलीसांकडुन करण्यात आलेली आहे. सदर प्रकरणी पुसद शहर पोलीस ठाणे येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक धिरज बांडे यांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा नोंद करण्यात आला असुन गुन्हयाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश देशमुख हे करीत आहेत.
Video Post
SidDhi Printers
न्युज पोर्टल, न्युज चॅनेल, वेब साठी संपर्क करा
8177881420